(रत्नागिरी)
रत्नागिरी एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने भांडाफोड केला आहे. या कारवाईत एका नेपाळी महिलेचा अटक करण्यात आली असून, दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 अंतर्गत करण्यात आली.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून प्लॉट क्र. ई-69, मिरजोळे एमआयडीसी येथे छापा टाकला. छाप्यात एका नेपाळी महिलेकडून पुण्यातील दोन महिलांना देहविक्रीसाठी भाग पाडण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेतले आणि पीडित महिलांची सुटका केली.
या प्रकरणी नेपाळी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात सुरू आहे.
ही कारवाई रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलिस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
या पथकात सपोनि. श्रीमती शबनम मुजावर, श्रेणी पोउनि. संदीप ओगले, पोहेकॉ. विजय आंबेकर, दिपराज पाटील, विवेक रसाळ, भैरवनाथ सवाईराम, मपोहेकॉ. स्वाती राणे, शितल कांबळे, मपोकॉ पाटील आणि पोना दत्ता कांबळे यांचा समावेश होता.

