(रत्नागिरी)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर तसेच जय किसान तरुण मंडळ, वडणगे यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा कोल्हापूर येथे १२ व १३ सप्टेंबर रोजी पार पडल्या.
या स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील तायक्वांदो क्लबच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत ३ सुवर्णपदक आणि ५ कास्यपदकांची कमाई केली.
पदक विजेते खेळाडू :
सुवर्णपदक : स्वरा साखरकर, सार्थक चव्हाण, अध्या कवीतके
कास्यपदक : मृण्मयी वांगणकर, यज्ञा चव्हाण, मृदुला पाटील, त्रिशा मयेकर, गौरी विलणकर
सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची निवड आता छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी झाली आहे. या यशामागे तायक्वांदो प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच सौ. आराध्या प्रशांत मकवाना आणि शाहरुख शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या कामगिरीबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी गणेश जगताप, तालुका समन्वयक विनोद मयेकर, महाराष्ट्र राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष व्यंकटेशराव कररा, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास लोखंडे, खजिनदार शशांक घडशी, सचिव लक्ष्मण कररा, तसेच प्रशिक्षक मिलिंद भागवत, मुख्याध्यापक, पालक, क्रीडाशिक्षक, संस्थेचे संचालक आणि क्लबचे पदाधिकारी यांनी खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

