(गुहागर)
तालुक्यातील हेदवी येथील मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटी संचलित, मातोश्री लक्ष्मीबाई भाऊ हेदवकर विद्यानिकेतन, हेदवी या शाळेच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने तालुकास्तरीय पावसाळी कबड्डी क्रीडा स्पर्धेत विजेतेपद मिळविले.
रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये गुहागर तालुक्यातील देवघर येथे झालेल्या पावसाळी कबड्डी क्रीडा स्पर्धेत शाळेचा संघ सहभागी झाला होता. या संघाला योगेश चव्हाण, राजेंद्र मोरे, सौ.रुची रेडीज यांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल सहभागी खेळाडू विद्यार्थिनीचे व शिक्षकांचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक श्रीकांत जोगळेकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

