(संगमेश्वर / एजाज पटेल)
सरकारने रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी १७ सप्टेंबरपासून नवीन नियम लागू केले आहेत. या बदलांमुळे नियमभंग करणाऱ्यांवर त्वरित कारवाई शक्य होणार असून, दंडाची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होणार आहे.
नव्या नियमांनुसार ई-चलान प्रणाली सक्तीने राबवली जाणार आहे. यामध्ये वाहतूक पोलीस स्मार्टफोन किंवा टॅब्लेटच्या मदतीने तात्काळ इलेक्ट्रॉनिक चलान जारी करतील. हे चलान वाहन मालकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठवले जाईल. त्यात वाहन क्रमांक, उल्लंघनाचा प्रकार, दंडाची रक्कम आणि भरण्याची अंतिम तारीख यांचा तपशील असेल.
महत्त्वाचे बदल आणि दंड
- विना हेल्मेट वाहन चालविल्यास परवाना रद्द
- सीट बेल्ट न लावणे : ₹१,०००
- मद्यप्राशन करून वाहन चालवणे : ६ महिने तुरुंगवास + ₹१०,००० दंड / दोन्ही
- पुन्हा उल्लंघन केल्यास : २ वर्षे तुरुंगवास + ₹१५,००० दंड
- विना परवाना वाहन चालवणे : ₹५,०००
- प्रदूषण प्रमाणपत्र (PUC) नसल्यास : ₹१०,००० पर्यंत दंड
- चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, ओव्हरस्पीडिंग : दंडात मोठी वाढ
ई-चलान भरण्याचे पर्याय
- ऑनलाईन पेमेंट – वाहतूक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर
- डिजिटल वॉलेट्स – पेटीएम, गुगल पे इत्यादीवर
- वाहतूक पोलीस ठाणे – जवळच्या ठाण्यात थेट दंड भरण्याची सुविधा
या नियमांमुळे वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

