(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटी मालगुंड या संस्थेच्या गुहागर तालुक्यातील कै.डॉ.दिलीप मुरारी उर्फ नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय काजुर्ली येथील विद्यालयात हिंदी भाषा दिन प्रश्नमंजुषा स्पर्धेने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.आशिष घाग,सहाय्यक शिक्षिका श्रीम.परवीन तडवी, सौ.वर्षा पवार, सौ.पल्लवी महाडिक, श्रीम.वैष्णवी पावरी तसेच सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
हिंदी भाषा दिनानिमित्त प्रशालेचे मुख्याध्यापक व हिंदी विषय शिक्षक श्री.आशिष घाग यांनी हिंदी भाषा दिनाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या दिनाचे औचित्य साधून हिंदी भाषा या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन सहाय्यक शिक्षिका सौ.पालवी महाडिक यांनी केले. त्यावेळी इयत्ता आठवी, नववी, दहावीतील विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेमध्ये इयत्ता आठवी ने प्रथम क्रमांक मिळवला. विजेत्या स्पर्धकांना प्रशालेचे मुख्याध्यापक आशिष घाग यांनी प्रोत्साहित बक्षीस देऊन अभिनंदन केले.

