(रत्नागिरी)
20 ते 22 डिसेंबर रोजी शेरू क्लासीक स्पर्धा मुंबई येथे संपन्न झाल्या. त्यात जाधव फिटनेस ॲकेडमी तर्फे साहील शेट्ये याने सहभाग घेतला होता. ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा असल्यामुळे मोठ्या मानाची मानली जाते. त्यातूनच प्रो काडँचे वाटप केले जावून स्पर्धक आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्यात पात्र होतो.
या स्पर्धेत साहील ला दुसरा क्रमांक मिळविला असून हैदराबाद येथे झालेल्या नरेश शेरु क्लासीक स्पर्धेत 6 वा क्रमांक मिळविला आहे. या स्वरूपाच्या मोठ्या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातून ॲकेडमीचे स्पर्धक मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. त्याला मार्गदर्शन हेमंत जाधव सर व शुभम जोशी सर यांचे लाभले असून ॲकेडमी अध्यक्ष आमदार भैय्याशेठ सामंत व ॲकेडमी मार्गदर्शक उद्योजक मंत्री उदय सामंत यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत. अशा गुणी खेळाडूंच्या भविष्याचा प्रश्न वरील मान्यवरांच्या हस्ते ॲकेडमी मार्गी लावणार असल्याचे आश्वासन वरील मान्यवरांकडून ॲकेडमीने दिले आहे.