(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील बसणी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या ज्येष्ठ सदस्या आशा गणपत कदम यांचे नुकतेच निधन झाले. यावेळी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी बसणी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीकडून त्यांचे चिरंजीव मंगेश गणपत कदम व कुटुंबीय यांचेकडे सोसायटीचे चेअरमन जयवंत बापूराव कदम व सदस्या प्रिया प्रशांत बंदरकर (मिनल) यांचे हस्ते रोख रक्कम देऊन त्यांना आर्थिक मदतीचा हात देण्यात आला.
दिवंगत आशा गणपत कदम यांचे चिरंजीव मंगेश कदम यांनी याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून धन्यवाद व्यक्त केले. बसणी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या या सेवाभावी कार्याबद्दल संपूर्ण बसणी परिसरातील ग्रामस्थांमधून विशेष अभिनंदन होत आहे.

