(रत्नागिरी / प्रतिनिधी)
वंचित बहुजन आघाडीची रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून दुसऱ्यांदा गौतम धोंडीराम गमरे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. गमरे यांच्या नेतृत्वाखालील नव्या कार्यकारिणीमुळे पक्ष संघटनाला नवे बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी सुभाष संभाजी जाधव, सुरेश गोविंद मिसे, शंकर तात्या लाड आणि रविंद्र कृष्णा कांबळे यांची निवड झाली आहे. तर महासचिवपदी सिद्धार्थ गोविंद कांबळे, सुरेश विठ्ठल गमरे, जयसिंग गोविंद जाधव, सिद्धार्थ ध्यानंद सावंत यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कार्यक्षम संघटन रचना लक्षात घेता सचिवपदी सुनील कृष्णा कांबळे, चेतन लक्ष्मण नाईक, एस. सी. कांबळे यांची निवड झाली. त्याचप्रमाणे सहसचिवपदी मुजफ्फर हुसैन मुर्तला, विवेक विलास जाधव, राकेश भाऊ कांबळे, राजेंद्र कांबळे यांचा समावेश आहे. संघटकपदी अनंत यशवंत सावंत व प्रकाश शंकर कांबळे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तर सदस्यपदी बाबाजी मोहिते, तुकाराम सकपाळ, मारुती जोशी आदींचा सहभाग आहे.
या निवडींनंतर गौतम गमरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, सर्वांच्या सहकार्याने आणि विश्वासामुळे मला पुन्हा एकदा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे. बाळासाहेबांनी दिलेल्या या संधीबद्दल मी ऋणी आहे.पक्षाच्या ध्येयधोरणांना न्याय देत रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी अधिक सक्षमपणे उभी करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच पक्षाच्या सामाजिक व राजकीय वाटचालीत गती आणण्यासाठी ही कार्यकारिणी महत्वाची भूमिका बजावेल, तसेच जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटन विस्तारासाठी अधिक जोमाने काम करणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे कामकाज केवळ राजकारणापुरते मर्यादित न ठेवता सामाजिक भान जोपासत राजकारण व समाजकारण यांची सांगड घालून पुढे नेण्याचा आमचा ठाम मानस आहे.

