(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिरात अनंत चतुर्दशी निमित्ताने श्रींच्या चरणी फळांची आरास करण्यात आली. ही मनमोहक आरास गणपतीपुळे मंदिराचे मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली.
गणपतीपुळे मंदिरात मागील काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारची आरास वेगवेगळ्या स्वरूपात स्वयंभू श्रींच्या समोर करण्यात आली होती. त्यामुळे यंदाच्या अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने श्रींच्या चरणी फळांची मनमोहक आरास करण्यात आल्याची माहिती संस्थान श्रीदेव श्री क्षेत्र गणपतीपुळे चे मुख्य पुजारी अभिजीत विनायक घनवटकर यांनी दिली. या अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने गणपती मंदिरात करण्यात आलेली ही मनमोहक आरास पाहून श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक व पर्यटकांनी आनंद व्यक्त करीत अत्यंत देखणे दृश्य आपल्या नजरेत टिपले.

