(रत्नागिरी / दत्तात्रय गोगटे)
चिपळूण (शिवाजी नगर) येथील डॉ. सुयोग माधव सोमण भारतीय अंतराळ संशोधन संरक्षण संस्था (इस्त्रो) येथे शास्त्रज्ञ म्हणून नुकतेच रुजू झाले आहेत. या नियुक्तीमुळे डॉ. सुयोग हे कोकण विभागातील पहिलेच शास्त्रज्ञ ठरले आहेत.
चिपळूण शहरात रहाणारे प्रसिद्ध डॉ. माधव वसंत सोमण व डॉ. सौ. राजश्री माधव सोमण यांचे द्वितीय पुत्र सुयोग यांनी AERODYNAMICS AND FLIGHT MECHANICS या विषयात अव्वल गुण प्राप्त करीत इस्रो द्वारा संचालित Indian Institute of Space Science and Technology – IIST त्रिवेंद्रम (THIRUVANANTHPURAM ) येथून M.TECH ही पदवी नुकतीच प्राप्त केली. त्यानंतर डॉ. सुयोग सोमण हे 10 ऑगस्ट 2025 रोजी बंगलोर स्थित दिगंतरा नामक कंपनीमध्ये उपग्रह सुरक्षा आणि व्यवस्थापन क्षेत्रात शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत झाले आहेत.
भारत सरकारच्या अंतराळ क्षेत्रात तसेच, संरक्षण क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित करत असलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संरक्षण संस्था ( इस्त्रो) या संस्थेत निवड झालेले ते कोकणातील पहिलेच व एकमेव शास्त्रज्ञ आहेत.
डॉ. सुयोग यांचे मूळगाव रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धामणंद आहे. चिपळूण येथे वैद्यकीय व्यवसाईक डॉ. माधव सोमण (वडील) यांचे चिपळूण येथेच वास्तव्य असल्याने सुयोगचे सुरूवातीचे शिक्षण चिपळूण शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूल या शाळेत झाले आहे.
या निवडीबद्दल डाॅ. सुयोग यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

