(कळझोंडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी पंचशील नगर येथील बुद्धविहारात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कळझोंडी आरोग्य उपकेंद्र व महिला बचत गट ग्रामसंघाच्या वतीने आयोजित या उपक्रमात विविध योगासने आणि प्राणायामाचे सत्र घेण्यात आले.
या कार्यक्रमाला कळझोंडी आरोग्य उपकेंद्राच्या सी.एच.ओ. हर्षदा सिरसेकर, मलेरिया निर्मूलन विभागाचे कर्मचारी सुरेश अंबुरे, संघर्ष ग्राम संघाच्या अध्यक्षा शुभांगी पवार, प्रभाग संघाच्या सचिव शीतल पवार, सरपंच दीप्ती वीर, सी.आर.पी. धनश्री चौघुले, जेष्ठ आरोग्य कर्मचारी नम्रता पवार आणि सावित्रीबाई फुले आदर्श महिला मंडळाच्या अध्यक्षा नलिनी पवार यांच्यासह गावातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमात सी.एच.ओ. सिरसेकर, सुरेश अंबुरे, नम्रता पवार आणि धनश्री चौघुले यांनी प्राणायाम व योगासनांचे महत्त्व विषद करत मार्गदर्शन केले. त्यांनी आरोग्यसंपन्न जीवनासाठी नियमित योग साधनेचे महत्त्व अधोरेखित केले.
या शिबिरात सहभागी झालेल्या महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आनंद व्यक्त केला. त्यांनी यापुढेही नियमितपणे योग व प्राणायाम सुरू ठेवण्याचा संकल्प केला आहे.
या उपक्रमाला पत्रकार किशोर पवार यांनी भेट देत महिलांच्या कार्याचे कौतुक केले. “ग्रामीण भागातील महिलांनी संघटितपणे समाजोपयोगी उपक्रम राबवून एक सकारात्मक आदर्श निर्माण केला आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल बुद्धविहार उपलब्ध करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले आदर्श महिला मंडळासह आरोग्य कर्मचारी, बचत गट व सर्व सहकार्यकर्त्यांचे आभार सामाजिक कार्यकर्त्या सौ. धनश्री चौघुले यांनी मानले.