(रत्नागिरी)
रत्नागिरीतील गोगटे कॉलेज परिसरात बांधकाम सुरू असताना स्टील कटिंग मशीनवर काम करणाऱ्या एका कामगाराचा करंट लागून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (३१ ऑगस्ट) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास घडली.
मृत कामगाराचे नाव रामचंद्र गयाप्रसाद पासवन (वय २७, रा. गोगटे कॉलेजजवळ, मुळगाव – नरैया, ता. बिंदकी, जि. फत्तेपुर, उत्तरप्रदेश) असे आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोगटे कॉलेज परिसरात जून २०२४ पासून कौलगुट कन्स्ट्रक्शन मिरज या कंपनीकडून इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी काम करणारा रामचंद्र पासवन रविवारी स्टील कटिंग मशीनने वायडींग वायर कट करत असताना अचानक करंट पायाला लागून बेशुद्ध पडला.
कंपनीतील साईट इंजिनिअर कुंदन उत्तम मगर (वय ४०) यांनी तात्काळ पासवन यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.

