(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा ज्युनिअर अॅथलेटिक्स मीट 2025 ही स्पर्धा दिनांक 24 ऑगस्ट रोजी एस.व्ही.जे.सी.टी., डेरवण (ता. चिपळूण) येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र उर्दू हायस्कूल, कडवईच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करत तब्बल 12 पदकांची कमाई केली.
पदक विजेते विद्यार्थी :
अंडर-14 गट
हंजला सोलकर (त्रिक्रीडा) – रौप्य पदक
सारा खान (त्रिक्रीडा) – रौप्य पदक
अंडर-16 गट
झोया मजगावकर – सुवर्ण (गोळाफेक), सुवर्ण (भालाफेक)
आसिम सांगे – सुवर्ण (गोळाफेक)
अरहान जांभरकर – सुवर्ण (भालाफेक), रौप्य (गोळाफेक)
झाहिद शेख – रौप्य (भालाफेक)
नूर आलम अन्सारी – कांस्य (भालाफेक)
अंडर-18 गट
मिज्याफ जांभरकर – सुवर्ण (भालाफेक)
माहीर सोलकर – कांस्य (भालाफेक)
रजीन सोलकर – कांस्य (गोळाफेक)
यामध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावलेल्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांच्या अथक मेहनतीबरोबरच क्रीडा शिक्षक जावेद दखनी यांच्या मार्गदर्शनाला जाते. तसेच मुख्याध्यापक रिज़वान करिगर यांचे प्रोत्साहन आणि पालकांचे सहकार्य यामुळेच महाराष्ट्र उर्दू हायस्कूलने हा ऐतिहासिक टप्पा गाठला..विजेत्या विद्यार्थ्यांचे शाळा परिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.

