(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथील माहिगीर मोहल्ल्यातील नमीरा टेमकर हिने एम.बी.बी.एस. पदवी संपादन करून आपल्या मोहल्ल्यातील पहिली डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे.
नमीरा ही परवेज टेमकर यांची कन्या असून परवेज टेमकर यांनी गावातील उर्दू शाळेत शिक्षण घेतले होते. त्यांनी आपल्या मुलीला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी नमीराला जॉर्जियातील तिब्लीसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी येथे उच्च शिक्षणासाठी पाठविले. नमीराने येथे ८१ टक्के गुण मिळवत यश संपादन केले.
मजगावच्या वरच्या मोहल्ल्यातील अनेक तरुण-तरुणींनी यापूर्वी वैद्यकीय क्षेत्रात आपले करिअर घडवले आहे. मात्र माहिगीर मोहल्ल्यातील पहिली डॉक्टर म्हणून नमीरा टेमकरने विशेष इतिहास रचला आहे.
या यशाबद्दल माहिगीर मोहल्ला जमाती तर्फे तिचा थाटामाटात सत्कार करण्यात आला. या वेळी जमातीचे बशीर सोलकर, इक्बाल मजगांवकर, इम्तियाज फणसोपकर, अनिस होडेकर, अब्दुल अझीझ मजगांवकर, सरपंच फैयाज मुकादम, उपसरपंच शरीफ इबजी यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहल्ला जमातीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.

