(खेड)
तालुक्यातील संगलट येथे बीएसएनएलच्या टॉवरवर अज्ञात चोरट्यांनी हात साफ केला आहे. तब्बल २ लाख २० हजार रुपयांचा इलेक्ट्रॉनिक मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला असून या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीएसएनएल कार्यालयातील तंत्रज्ञ महेंद्र शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते व गोव्यातील वेदांत कंपनीचे कर्मचारी टॉवरचे साहित्य बसविण्यासाठी ३० जुलै रोजी सकाळी संगलट येथे आले होते. त्यावेळी टॉवरच्या बंद रूममधील कुलूप कोणी अज्ञात इसमाने तोडल्याचे व आत ठेवलेला काही मुद्देमाल चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यानंतर फिर्यादी संदीप नारायण देसाई (रा. मिरज, जि. सांगली) यांनी १९ ऑगस्ट रोजी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता चोरीची घटना निश्चित झाली. चोरट्यांनी १५ जुलै रोजी ठेवलेले दोन रिमोट रेडिओ हेड्स (RRH-B1, B28 व RRH-B28) प्रत्येकी १ लाख १० हजार रुपये किंमतीचे असा एकूण २ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे.
या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गु. र. नं. २६३/२०२५ भा. दं. सं. २०२३ कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

