(रत्नागिरी)
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, तालुका शाखा रत्नागिरीची सर्वसाधारण सभा दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी तालुकाध्यक्ष श्री. राहुल अलकटवार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.
सभेला जिल्हा सरचिटणीस श्री. दत्तात्रय क्षिरसागर, जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ. विभा बाणे, सेवापुस्तक मार्गदर्शक श्री. सुहास पवार, बँक ऑफ इंडियाच्या झोनल अधिकारी श्रीमती नाईक, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री. महेंद्र ढाकणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात तालुका सचिव श्री. अवधूत शिंदे, तालुका कार्याध्यक्ष श्री. तुकाराम मुरकुटे, उपाध्यक्ष श्री. सुजित वाफेलकर, कोशाध्यक्ष श्री. रामनाथ बणे, सहसचिव श्री. गणपती पडुळे, तालुका महिला आघाडी प्रतिनिधी सौ. अक्षता सायगावकर, तालुका संघटक श्री. मनोहर इनामे, तालुका प्रसिद्धी प्रमुख श्री. रामदास चव्हाण इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
सत्कार समारंभ
सभेत आदर्श पुरस्कारप्राप्त जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ. विभा बाणे, पदवीधर वेतनश्रेणी पदोन्नती मिळालेल्या सौ. अश्विनी पाटील, रत्नागिरी तालुक्यातील एकमेव जुनी पेन्शनधारक श्री. रुपेश शिंदे, SET परीक्षा उत्तीर्ण श्री. गणपती पडुळे तसेच सेवापुस्तक विषयातील मार्गदर्शक श्री. सुहास पवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
मार्गदर्शन सत्रे
श्री. सुहास पवार यांनी सेवापुस्तकातील नोंदी अद्यावत ठेवण्याचे महत्त्व, शैक्षणिक व आर्थिक नोंदींची तपासणी, रजा व इतर महत्वाच्या बाबींचे सविस्तर मार्गदर्शन केले. बँक ऑफ इंडियाच्या झोनल मॅनेजर श्रीमती नाईक यांनी सॅलरी अकाउंटचे फायदे, इन्शुरन्स सेवा आणि भावी सुविधा यावर भाष्य करत शिक्षक बांधवांना उत्कृष्ट सेवा देण्याचे आश्वासन दिले.
विशेष प्रस्ताव व आगामी कार्यक्रम
जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ. विभा बाणे यांनी महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला, सदर कार्यक्रम नवरात्र उत्सवात आयोजित करण्याचे ठरले. जिल्हा सरचिटणीस श्री. क्षिरसागर यांनी आगामी दिल्लीतील जुनी पेन्शन आंदोलनाची माहिती देऊन सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक श्री. संतोष कांबळे यांनी 17 ऑगस्ट रोजी रत्नागिरी येथे होणाऱ्या पतपेढीच्या सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
सभेचा समारोप
तालुक्यातील सर्व शाळांचे सुट्टीचे परिपत्रक वितरित करून तालुकाध्यक्ष श्री. राहुल अलकटवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन तालुका प्रसिद्धी प्रमुख श्री. रामदास चव्हाण यांनी केले.

