(चिपळूण / योगेश पेढांबकर)
गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित खदिजा इंग्लिश मिडियम स्कूल आणि खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल यांनी जिल्हास्तरीय गीतगायन स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत चतुर्थ क्रमांक पटकावला. ही स्पर्धा मरहूम मोहम्मद शमसुद्दीन खतीब सभागृह, खदिजा इंग्लिश मिडियम स्कूल येथे कोशिश फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत एकूण १२ शाळांमधील प्रत्येकी १५ विद्यार्थी सहभागी झाले होते. विविध संगीत वाद्यांच्या साथीने विद्यार्थ्यांनी मनमोहक गीत सादर केली. स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे कौतुक केले. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षक मौलाना अब्दुल रहमान चौगुले, सहाय्यक शिक्षिका कुमारी उमामा चिपळूणकर, शिक्षक शक्तीकुमार चव्हाण आणि कलाशिक्षक उदय मांडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. इरफान शेख यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष मुजाहिद मेयर आणि पदाधिकाऱ्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ही संस्था दरवर्षी अशा उपक्रमांचे आयोजन करते.
या यशाबद्दल गोवळकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. इसहाक खतीब, उपाध्यक्ष जफर कटमाले, सेक्रेटरी मुजाहिद मेयर, मुख्य कार्यकारी अधिकारी उरुसा खतीब तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.

