(संगमेश्वर / प्रतिनिधी )
विद्यार्थी गौरव समारंभ व स्मृती पुरस्कारांचे वितरण कोंडगाव साखरपा येथील सर्व सामान्यांचे सर्वमान्य नेतृत्व व गोरगरीबांचे कैवारी विंगत नाना साहेब शेट्ये यांचा ३२ वा स्मृतीदिन शुक्रवार दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी’ नाना शेट्ये सभागृह’ साखरपा येथे संपन्न होणार आहे. कै. नानासाहेबा शेट्ये स्मारक समितीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कै. नानासाहेवा शेट्ये स्मारक समिती ग्रामिणचे अध्यक्ष दत्ताराम शिंदे हे असणार आहेत तर प्रमूख पाहूणे म्हणून सुभाष लाड – अध्यक्ष राजापूर – लांजा तालुका नागरिक संघ व विजय बाईंग प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय व बाबासाहेब कोलते ज्युनि. कॉलेज, साखरपा हे उपस्थित रहाणार आहेत.
या समारंभात सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील पंचकोशीमधील शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी, क इ.१० वी व १२ वी च्या सर्व शाखांमधून प्रत्येक शाळेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थी आणि कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतून प्रथम आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा प्रमाणपत्र व रोख पारितोशिक देवून सत्कार करण्यात येणार आहे. तसेच कै. नानासाहेब शेट्ये यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या व्यक्ती व संस्था पुरस्कार सन २०२५ चे वितरण होणार आहे. सन २०२५ च्या व्यक्ती पुरस्कासाठी नारळ मित्र मधून सर्वत्र परिचित असलेले चेतन उक्ष्मण नाईक तर संस्था पुरस्कार) साठी धाटिवळे (पश्चिम विभाग) मराठा संघ, मुंबई या संस्थेची निवड करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील नानांवर प्रेम करणारे नागरिक विद्यार्थी, पालक, पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्थेचे हितचिंतक, सत्कार होणारे विद्यार्थी योनी उपस्थित रहावे असे आवाहन कै. नानासाहेब शेट्ये स्मारक समितीचे अध्यक्ष संदेश ऊर्फ बापूसाहेब शेट्ये, सरचिटणीस संतोष केसरकर, ग्रामीण समिती कार्याध्यक्ष गणपत शिर्के, चिटणीस रमाकांत शिंदे, खजिनदार मारुती शिंदे, रमाकांत शेट्ये, मनोहर पोतदार, अब्दुल हमीद खतिब, दीपक शेट्ये, प्रसाद कोलते , मिलींद भिंगार्ड, विरेंद्र शेट्ये, सुहास कदम यांनी केले आहे.