(दापोली)
दापोली शहरातील फॅमिली माळ परिसरातल्या टांगर गल्लीत शुक्रवार, रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास दोन मुलींवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोघीही गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जखमी मुलींची नावे सानिया अब्बास खोत (वय १५) आणि सिद्रा आमीन नायक अशी आहेत. दोघी क्लासला जात असताना ही घटना घडली. अचानकपणे काही भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर धाव घेत चावा घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून, पालकवर्गामध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिकांनी पालिकेकडून तत्काळ भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे.