(दापोली)
दापोलीत उडाण सर्व्हिसेस अँड इव्हेंटस् आयोजित दापोली महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दापोली आयडॉल पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यदांचां हा विशेष पुरस्कार कोकण कट्टा न्यूजचे संपादक आणि जय महाराष्ट्र चे वृत्तनिवेदक तेजस बोरघरे यांना प्रदान करण्यात आला.
तेजस बोरघरे हे गेल्या 8 वर्षापासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. लोकसत्ता, मॅक्स महाराष्ट्र, लोकशाहीसारख्या न्यूज चॅनलमध्ये त्यांनी काम केले असून सध्या ते जय महाराष्ट्र या चॅनलमध्ये अँकर म्हणून काम करत आहेत.
गेल्या ८ वर्षात बातम्यांच्या माध्यमातून कोकणातील अनेक स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी न्यायिक भूमिका घेऊन त्यांनी बातम्या केल्या आहेत. गेल्या एका वर्षापासून आपल्या सर्वांना परिचित असलेला त्यांचा चॅनेल कोकण कट्टा न्यूजचे संपादक म्हणूनही ते काम पाहत आहेत.
विशेषतः दापोलीतील अनेक सामाजिक बातम्या त्यांनी दिल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून अनेक बातम्यांचा इम्पॅक्ट झाला आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमी सामाजिक भूमिका घेऊन त्यांनी पत्रकारिता सुरू केली आहे. सामाजिक बातम्या आणि जनहिताच्या बातम्या आणि सामन्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून ते करत आहेत. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही एक छोटी सुरुवात त्यांनी केली आहे.
सत्याला धरुन पत्रकारिता आणि या प्रवासात सहकारी पत्रकार जाहीद मुजावर, सलीम रखांगे जे पूर्णपणे कोकण सांभाळतात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग याची जबाबदारी ते पार पाडत आहेत. असे ही त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले आहे.