(रत्नागिरी)
टिळक आळी भगिनी मंडळातर्फे लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त पठण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये श्रीरंग दामले, आराध्या केळकर, मुक्ता बापट यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावले.
तीन गटामध्ये स्पर्धा घेण्यात आली. इयत्ता पाचवी व सहावीच्या गटासाठी गीताईचा बारावा अध्याय, इयत्ता सातवीसाठी १८ श्लोकी गीता व आठवी-नववीच्या गटासाठी भगवद्गीतेचा बारावा अध्याय (संस्कृत) पठण करायचे होते. परीक्षक म्हणून अश्विनी जोशी व मेधा घाणेकर यांनी काम पाहिले. स्पर्धेचे बक्षीस वितरण परीक्षक, अध्यक्षांच्या हस्ते झाले. या वेळी भगिनी मंडळाच्या अध्यक्ष राधिका वैद्य, उपाध्यक्ष अर्चना जोगळेकर व सर्व कार्यकारिणी सदस्य, पालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- पाचवी ते सातवी गट- प्रथम- श्रीरंग नीलेश दामले (फाटक हायस्कूल), द्वितीय- वल्लरी विनायक मुकादम (पटवर्धन हायस्कूल), तृतीय- श्रुती संदीप आठल्ये (पटवर्धन हायस्कूल), उत्तेजनार्थ- चैतन्य प्रणव अभ्यंकर (फाटक हायस्कूल). इयत्ता सातवी- प्रथम- आराध्या ओंकार केळकर, द्वितीय तनिष्का महेंद्र मापुस्कर, तृतीय पूजा अमोल पेडणेकर (तिघीही पटवर्धन हायस्कूल). इयत्ता आठवी- नववी- प्रथम- मुक्ता मोहन बापट (फाटक हायस्कूल), द्वितीय- सिद्धी चारूल मोडक (शिर्के प्रशाला), तृतीय गार्गी माधव काणे, उत्तेजनार्थ- सारा समीर महाजन (दोघीही फाटक हायस्कूल.)