(रत्नागिरी)
रत्नागिरीकरांसाठी एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण… आता पैशाअभावी आजार लपवण्याची किंवा मुंबई, पुणे, कोल्हापूरकडे धाव घेण्याची गरज भासणार नाही. जिजाऊ संस्था लोकांच्या सेवेसाठी श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय हे एक अत्याधुनिक आणि मोफत रुग्णालय सुरू करत आहे.
अनेक वर्षांच्या काळात अनेक सरकारे आली-गेली, स्थानिक लोकप्रतिनिधी बदलले, योजनांची चर्चा झाली – पण गरिबांसाठी मोफत आणि दर्जेदार आरोग्यसेवा हे केवळ एक स्वप्नच राहिले होते. पण आता हे स्वप्न साकार होत आहे — तेही कोणत्याही सरकारी मदतीशिवाय, स्वखर्चातून!

श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय या नावाने रत्नागिरीत उभारले जात असलेले हे रुग्णालय म्हणजे एका सेवाभावी प्रवासाची पक्की पायाभरणी आहे. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून निलेश सांबरे सरांनी केवळ रुग्णालय उभारलेले नाही, तर रत्नागिरीसारख्या कोकणपट्ट्यातील हजारो गरिबांना एक नवीन आशेचा किरण दिला आहे. या उपक्रमामध्ये ना राजकारण, ना प्रसिद्धीचा हव्यास – फक्त आणि फक्त “माणूस” केंद्रस्थानी ठेवलेली सेवा आहे. यामुळे श्री. निलेश भगवान सांबरे रत्नागिरीचे आरोग्यसेवेच दूत ठरले आहेत. “जर आपल्याला देशासाठी काम करायचं असेल, तर ते काम आपण अगदी प्रामाणिकपणे केलं पाहीजे.” असे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी म्हटले आहे.
लोकार्पण सोहळा:
ही आरोग्यसेवेची नवी पहाट रविवार, 1 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता उजाडणार आहे.
📍 ठिकाण: श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय, आय.टी.आय रत्नागिरीजवळ, आठवडा बाजार समोर, नाचणे रोड, रत्नागिरी.
या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना दर्जेदार आणि मोफत वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. जिजाऊ संस्थेच्या या पुढाकारामुळे समाजात आरोग्य विषयीची जागरूकता वाढणार असून, ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गोर-गरिबांसाठी जीवनदायी आशा ठरलेले, “मानवतेचे खरे पुजारी श्री. निलेशजी भगवान सांबरे” असे गौरवोद्गार सध्या संपूर्ण जिल्ह्यात ऐकू येत आहेत. कारण आता लवकरच रत्नागिरीत त्यांच्या पुढाकारातून उभारले जात आहे श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय – एक असा उपक्रम, जो खर्या अर्थाने सेवा म्हणजे काय हे सिद्ध करतोय.
श्री. निलेश सांबरे हे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरीब जनतेसाठी आरोग्यसेवा पोहोचवण्याचे काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू होणारे हे रुग्णालय म्हणजे गरजूंना आधार देणारा, आरोग्याचा प्रकाश देणारा आशेचा किरण आहे.
या रुग्णालयात आर्थिक अडचणींमुळे उपचार न मिळालेल्या रुग्णांसाठी सर्व सेवा मोफत असतील. यामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, तपासण्या, औषधोपचार आणि शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे.

