(रत्नागिरी /प्रतिनिधी)
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या आणि भाविकांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने एकूण १६ विशेष गाड्यांच्या फेऱ्या जाहीर केल्या आहेत. या गाड्या मुंबई, पुणे आणि गुजरात येथून कोकण रेल्वेमार्गावर धावणार असून, चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडी आणि मडगाव यांसारख्या प्रमुख स्थानकांपर्यंत प्रवाशांना नेणार आहेत.
१७ जुलै रोजी रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या या विशेष गाड्यांमध्ये पश्चिम रेल्वेच्या ५ आणि मध्य रेल्वेच्या ११ गाड्यांचा समावेश आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणातील गणपतीच्या उत्सवासाठी हजारो भाविक गावाकडे मार्गस्थ होतात. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत.
🔹 मध्य रेल्वेच्या ११ विशेष गाड्या :
1. 01151/52 – मुंबई CSMT – सावंतवाडी (रोज)
2. 01153/54 – मुंबई CSMT – रत्नागिरी (रोज)
3. 01167/68 – लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी (रोज)
4. 01171/72 – लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी (रोज)
5. 01185/86 – लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव (साप्ताहिक)
6. 01165/66 – लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव (साप्ताहिक)
7. 01447/48 – पुणे – रत्नागिरी (साप्ताहिक)
8. 01445/46 – पुणे – रत्नागिरी (साप्ताहिक)
9. 01103/04 – मुंबई CSMT – सावंतवाडी (रोज)
10. 01129/30 – लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी (साप्ताहिक)
11. 01155/56 – दिवा – चिपळूण (रोज)
🔹 पश्चिम रेल्वेच्या ५ विशेष गाड्या :
पश्चिम रेल्वेनेही गुजरात व मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी २२ फेऱ्यांसह ५ विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे:
1. 09011/12 – मुंबई सेंट्रल – ठोकूर (साप्ताहिक)
2. 09019/20 – मुंबई सेंट्रल – सावंतवाडी (आठवड्यातून ४ दिवस)
3. 09015/16 – वांद्रे – रत्नागिरी (साप्ताहिक)
4. 09114/13 – बडोदा – रत्नागिरी (साप्ताहिक)
5. 09110/09 – विश्वामित्रा – रत्नागिरी (साप्ताहिक)
या गाड्यांसाठी आरक्षण लवकरच सुरू होणार असून, कोकणात आपल्या लाडक्या गणरायाच्या भेटीसाठी निघालेल्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या विशेष गाड्यांचे वेळापत्रक आणि तिकीट आरक्षणाची माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.