(खेड)
११४ ग्रामपंचायतींसाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या २०२५- २५३० सरपंचपदाचे आरक्षण भरणेतील श्री देवी काळकाई मंदिर सभागृहात सोडतीने काढण्यात आले. तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या भडगाव, आवाशी व भरणे या तिन्ही ग्रामपंचायतीत आरक्षित झाल्याने येथील सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्याचा हिरमोड झाला.
अन्य ग्रामपंचायतींचे आरक्षण : अनुसूचित जाती स्त्री : मोरवंडे, शिर्शी व कुळवंडी. अनुसूचित जमाती स्त्रीः शिंगरी. अनुसूचित जाती : निळीक, बिजघर व भेलसई. नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री : कळंबणी बुद्रुक, कशेडी, घाणेखूंट, घेरा रसाळगड, चिंचवली, तिसे, पन्हाळजे, भरणे, मोहाने, लोटे, वडगाव, वावे तर्फे खेड, शिरवली व शेरवल. नागरिकांचा मागास प्रवर्ग : वरवली, सोनगाव चौगुले मोहल्ला, बहिरवली, राजवेल, तुळशी खुर्द, पोयनार, मांडवे, मिर्ले, आंबवली, आस्तान, ऐनवरे, उधळे बुद्रुक, कसबा नातू, व कोंडिवली.
तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या भरणे ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री झाल्यामुळे महिला इच्छुकांची धडधड वाढली आहे. तालुक्यातील सुकीवली, वेरळ, भोस्ते व फुरुस या मोठ्या महसुली ग्रामपंचायती सर्वसाधारण म्हणून खुल्या आहेत. ११४ तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये ५७ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.

