(चिपळूण)
महिलांवर वाढते अत्याचार व सुरक्षततेचा प्रश्न गांभिर्याने मांडण्यासाठी “महिला सुरक्षा काळाची गरज ” या विषयावर एक प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण येथील चतुर्थ वर्षातील कृषिकन्यांच्या समूहाने सादर केले असून या पथनाट्याद्वारे समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पथनाट्यात महिलांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांवर जसे की स्त्रीभ्रूणहत्या, छेडछाड, कौटुंबिक हिंसाचार आणि सार्वजनिक ठिकाणी असुरक्षितता अशा विविध मुद्द्यांना भिडण्याचा प्रयत्न या सादरीकरणातून झाला. विद्यार्थीनींनी अत्यंत संवेदनशीलतेने आणि प्रभावी अभिनयाने समाजातील महिलांच्या सुरक्षतेसंबंधीच्या प्रश्नांना उचलून धरले. पथनाट्यांनंतर उपस्थित प्रेक्षकांनी आपली मते मांडली व कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली.
सदर कार्यक्रमासाठीचे मार्गदर्शन हे कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्रशांत इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले.
पथनाट्य यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अमिषा कोळी, वृषाली गोफणे, प्रज्ञा गोठणकर ,साक्षी अवतार, साक्षी गुरव, दीक्षा खांडेकर, सृष्टी काळे, मृणाल उपाध्ये, प्रीती पेरवी, मयुरी ढेकळे या कृषीकन्यांचे सहकार्य लाभले. या पथनाट्याद्वारे तरुणाईने सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत महिला सुरक्षेचा गंभीर विषय प्रभावीपणे मांडल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.