(सांगली)
सांगली जिल्ह्यातील करगणी (ता. आटपाडी ) येथील अल्पवयीन मुलीने सोमवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आटपाडी तालुक्यातील करगणी येथील दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. यानंतर या मुलीनं राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेनं सांगली चांगलीच हादरली असून या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर गावकरी संतप्त झाले असून त्यांनी गाव बंद ठेवून आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करगणी गावातीलच काही टवाळखोर मुलं पीडित मुलीला त्रास देत होते. शाळेत जाताना येताना ते तिची छेड काढायचे. यातूनच त्यांनी या मुलीवर लैंगिक अत्याचार केला व त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले. याप्रकरणी राजू विठ्ठल गेंड व रामदास गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. अन्य दोघेजण फरार आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सायली ही इयत्ता दहावीमध्ये शिकत होती. सोमवार 7 जुलै रोजी सकाळी साडे सहाच्या पूर्वी करगणी ता.आटपाडी येथील राहत्या घरामध्ये रस्सीच्या सहाय्याने लोखंडी अंगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान मुलगी साहिलीने रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घरी जेवत असताना गावातील राजू गेंड, रामदास गायकवाड, रोहित खरात, व बनपुरी येथील अनिल काळे हे शाळेला जात असताना त्रास देतात व त्यांनी माझा लैंगिक छळ केला आहे त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले आहे. याबाबत तिला सकाळी बघू असे सांगितले असे पालकांनी सांगितले. दरम्यान, ती व तिची बहीण झोपी गेल्या होत्या. सकाळी लवकर लहान मुलीने साहिलीने गळफास घेतल्याचे सांगितले.
गावातच राहणारा संशयित आरोपी राजू गेंड यानं पीडित मुलीवर गावातीलच एका इमारतीच्या खोलीत लैंगिक अत्याचार केला होता. यावेळी त्याच्यासोबत असणाऱ्या त्याच्या मित्रांनी मोबाईलवरून त्याचं चित्रीकरण केलं होतं. यानंतर मुलांनी पुन्हा पीडितेला मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली. तसंच, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मुलीकडं वारंवार शरीर सुखाची मागणी करू लागले. यालाच कंटाळून मुलीनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, असा आरोप मुलीच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. तसंच, आटपाडी पोलिसांकडून कारवाई करण्यात दिरंगाई झाली. या प्रकरणी आटपाडी पोलिसांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि मुलीच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.
दरम्यान आरोपी यांच्या मोबाईलमध्ये अनेक महिला व मुलींच्या सोबत केलेल्या अत्याचाराच्या अत्याचाराचे व्हिडिओ मिळाले असून यामध्ये अनेक महिला व मुलींना बळजबरी केल्याचे चर्चा आहे. या बाबतही सखोल तपास करण्यात येणार आहे. दरम्यान मंगळवारी संपूर्ण करगणी गावांमध्ये सर्व दुकाने व व्यवहार बंद करून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
सोमवारी (7 जुलै) घटना घडल्यानंतर गावातील संतप्त जमावानं रामदास गायकवाड या संशयिताला बेदम मारहाण केली होती. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या रामदासला पोलिसांनी शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं. याबाबत मंगळवारी दिवसभर करगणी गावातील ग्रामस्थांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडला होता. या प्रकरणी चौघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

