( संगमेश्वर /प्रतिनिधी )
माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) यांच्या संगमेश्वर तालुका शाखेतर्फे देवरूख पोलिस ठाण्याचे नूतन पोलिस निरीक्षक सन्माननीय श्री. उदय झावरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने देवरूख शहरातील विविध ज्वलंत विषयांवर त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
शहरात वाढलेली वाहतूक, अस्ताव्यस्त पार्किंगमुळे निर्माण होणारी अडचण, अनधिकृत प्रखर हेडलाईट लावलेली वाहने, शहरात अद्यापही सीसीटीव्ही यंत्रणा राबवण्यात न आल्याची बाब, अवैध वाहतूक यावर नागरिकांना चिंता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर ट्रॅफिक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी पोलीस यंत्रणा उभारण्याची, संध्याकाळी सात ते नऊ या गर्दीच्या वेळेत ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती करण्याची, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले. माहितीचा अधिकार कार्यकर्त्यांवर काही वेळा होणाऱ्या खोट्या केसेस बाबतही उपस्थितांनी प्रश्न मांडले. या सर्व मुद्यांवर पोलिस निरीक्षक उदय झावरे यांनी सकारात्मक आणि समजूतदार भूमिका घेत आवश्यक त्या उपाययोजनांचे आश्वासन दिले.
या प्रसंगी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव, तालुकाध्यक्ष शेखर जोगळे, कार्याध्यक्ष विजय चव्हाण, अरविंद मोहिते, लता करंबेळकर, सुनील करंडे, प्रकाश खांडेकर, सुरेश घडशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

