(रत्नागिरी)
लांजा येथील सुप्रसिद्ध डॉ. प्रमोद तेंडुलकर यांचे सुपुत्र डॉ. सुश्रुत तेंडुलकर यांनी रत्नागिरीत नव्याने सुरू केलेल्या दवाखान्याचे उद्घाटन रत्नागिरीतील सुप्रसिद्ध सर्जन डॉ. रविंद्र गोंधळेकर यांच्या हस्ते नुकतेच झाले.
याप्रसंगी डॉ. सुश्रुत यांचे कुटूंबीय, डॉ. श्री. व सौ. गोंधळेकर, रत्नागिरीमधील अनेक प्रतिथयश डॉक्टर्स आणि हितचिंतक उपस्थित होते. नवीन क्लिनिकच्या उद्घाटनासाठी उपस्थित मान्यवरांनी डॉ. सुश्रुत तेंडुलकर यांना शुभेच्छा दिल्या.
डॉ. सुश्रुत हे जनरल सर्जन असून त्यांचे M.B.B.S. D.N.B. (Surgery) F.A.C.R.S.I. F.I.A.G.E.S. असे शिक्षण मुंबई येथे झाले आहे. त्यांनी मुंबई येथील कूपर वैद्यकीय महाविद्यालय सर्जन म्हणून आणि कळवा, ठाणे येथे राजीव गांधी शासकीय महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर आणि सर्जन म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय रत्नागिरी शासकीय महाविद्यालयात देखील सर्जन म्हणून काम पाहिले. त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया देखील यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. डॉ. सुश्रुत तेंडुलकर यांनी पोटाच्या शस्त्रक्रिया तसेच एंडोस्कोपीमध्ये विशेष फेलोशिप्स घेतलेल्या आहेत.
हा दवाखाना रत्नागिरी येथील डॉ. गोंधळेकर हॉस्पिटल, पॉवर हाऊस, नाचणे रोड येथे आहे. त्यांच्या वैद्यकीय सेवेचा रत्नागिरी जिल्ह्यातील गरजू रुग्णांना नक्कीच फायदा होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.