(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील स्वर्गीय आत्माराम नारायण देसाई सोमेश्वर माध्यमिक विद्यालय विल्ये ( मांजरे) या शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक कमलाकर धोंडू हेदवकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त त्यांच्या मूळ गावी वरवडे येथे दिनांक ६ जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त भव्य सपत्नीक सत्कार श्री राधाकृष्ण सेवा मंडळ व महिला मंडळ तसेच क्रीडा मंडळ वरवडे खारविवाडा यांच्या मार्फत करण्यात आला.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक कमलाकर धोंडू हेदवकर हे गेली अनेक वर्षे विल्ये (मांजरे )येथे सहायक शिक्षक म्हणून कार्यरत होते, त्या नंतर ते काही काळ मुख्याध्यापक पदि कार्यरत होते . ते ३१ मे २०२५ रोजी नियत वयोमानानुसार मुख्याध्यापक पदावरून सेवा निवृत्त झाले होते. कमलाकर धोंडू हेदवकर हे वरवडे गावचे रहिवासी आहेत पण आपल्या नोकरी निमित्त ते आपल्या गावापासून दूर होते. सहायक शिक्षक ते मुख्याध्यापक म्हणून त्यांची कारकिर्द गौरवास्पद होती. त्यांनी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी घडविले आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. याची दखल घेत त्यांच्या मूळ गावी वरवडे येथे प्रत्येक व्यक्तीला त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याचा अभिमान वाटतो. आणि त्यामुळे त्यांच्या मूळ गावी वरवडे येथे आषाढी एकादशी निमित्त त्यांचा सपत्निक भव्य सत्कार श्री राधाकृष्ण सेवा मंडळ व श्री राधाकृष्ण महिला मंडळ, श्री राधाकृष्ण क्रीडा मंडळ वरवडे खारविवाडा या मंडळाचे अध्यक्ष यशवंत लाकडे, गावकर गणेश खारवटकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला श्री राधाकृष्ण सेवा मंडळ वरवडे , श्री राधाकृष्ण महिला मंडळ, श्री राधाकृष्ण क्रीडा मंडळ वरवडे खारविवाडा या मंडळाचे अध्यक्ष यशवंत लाकडे, गावकर गणेश खारवटकर, श्री विठ्ठल रखुमाई सेवा मंडळाचे अध्यक्ष विष्णू पवार, वरवडे गावचे उपसरपंच गजानन हेदवकर, श्री चंडिका मच्छीमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र हेदवकर, शिक्षक सुशांत लाकडे तसेच मंडळाचे सर्व कार्यकर्ते, सभासद महिला मंडळ, तसेच तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.