(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जीवन विद्या मंडळ, कसोप- फणसोप ( मुंबई) संचालित श्री लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालयाचा शासकीय रेखा कला परीक्षांचा निकाल १०० टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने सप्टेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून येथील श्री लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करून १०० टक्के निकालाची परंपरा अबाधित ठेवली आहे.
एलिमेंटरी ग्रेड परीक्षेला तेरा विद्यार्थी सहभागी झाले होते ते सर्व उत्तीर्ण झाले. एंजल पालकर, अनुष्का बिडू, संजीवनी राड्ये, अमित मेस्त्री या विद्यार्थ्यांनी “अ” श्रेणी प्राप्त केली. तर भिक्ती डोळे, सानवी साळवी, भूमी गुरव, वैष्णवी शेलार, आदिती पालकर, अंतरा गोरीवले, तन्मय नारकर, ओम शिंदे या विद्यार्थ्यांनी “ब” श्रेणी प्राप्त केली. अंश चव्हाण या विद्यार्थ्याने “क” श्रेणी प्राप्त केली.
इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेला १६ विद्यार्थी बसले होते ते सर्व उत्तीर्ण झाले.त्या मध्ये चैताली शेलार , प्रेरणा भोजने, पूजा आग्रे,भक्ती कोकरे या विद्यार्थिनींनी “अ” श्रेणी प्राप्त केली. तर तन्वी मोरे, दिव्या तेरवणकर, विभावरी सागवेकर, श्रावणी कानसरे, श्रावण उबारे, सागर राड्ये, सर्वेश साळवी, सार्थक फुनगुसकर,या विद्यार्थ्यांनी “ब” श्रेणी प्राप्त केली. चैतन्य तिवरेकर, स्मित बेंद्रे, अश्र्वनी पाल, कनिष्क पावसकर यांनी “क” श्रेणी प्राप्त केली.
सर्व यशप्राप्त विद्यार्थ्यांना कलाशिक्षक उत्तम पवार यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापिका सौ.नेत्रा राजेशिर्के यांनी विद्यार्थ्यांचे व कलाशिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच संस्था अध्यक्ष श्री.कमलाकर साळवी, सचिव श्री, रितेश साळवी, शाळा समिती अध्यक्ष श्री. प्रकाश साळवी यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.