(रत्नागिरी / वार्ताहर)
भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, कोकणचे सुपुत्र, आमदार तथा माजी मंत्री आ. रवींद्र चव्हाण यांचा भव्य सत्कार महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या कार्यालयात करण्यात आला. रत्नागिरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक व पदाधिकारी यांनी सदर भेट घेऊन सन्मानचिन्ह प्रदान करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच झालेल्या या भेटीचे नेतृत्व रत्नागिरीचे सुपुत्र अनिकेत पटवर्धन यांनी केले. त्यांच्या पुढाकारामुळे हा सन्मानसोहळा यशस्वीपणे पार पडला. या विशेष प्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी नगरसेवक मुन्ना चंवडे, उमेश कुलकर्णी, राजू तोडणकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन करमकर, राजू भाटलेकर, राजन फाळके व मंदार खंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री. चव्हाण यांनी पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी कटिबद्ध राहतील, असे आश्वासनही त्यांनी दिले. या सन्मानप्रसंगामुळे उपस्थितांमध्ये नवचेतना निर्माण झाली असून, आगामी काळात कोकणातील भाजप संघटना अधिक भक्कम होईल, असा दृढ विश्वास व्यक्त करण्यात आला.

रत्नागिरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या वतीने नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

