सध्या देशभरात मान्सूनची सरी बरसत आहेत आणि हवेत गारवा दाटलाय. पावसाच्या या रिमझिम सरींसोबतच लोकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा आणखी एक गोड विषय चर्चेत आहे तो म्हणजे भारतीय आइसक्रीम! जगभरात भारतीय आइसक्रीमची चव आणि विविधता यांची जोरदार दखल घेतली जात आहे. TasteAtlas या जागतिक खाद्य निर्देशिकेनुसार, भारतातील पाच आइसक्रीम पार्लर्सना जगातील “टॉप 100 आइसक्रीम पार्लर्स” मध्ये मानाचं स्थान मिळालं आहे. जाणून घेऊया कोणत्या भारतीय आइसक्रीम पार्लर्सने ही आंतरराष्ट्रीय यशाची चव चाखली आहे:
🧁 रुस्तम अँड कंपनी – मुंबईचं आइस्क्रीम सँडविच
1953 पासून मुंबईतील या पारशी स्टाईल आइसक्रीम पार्लरने ग्राहकांची मने जिंकली आहेत. ‘आइसक्रीम सँडविच’ ही इथली खासियत – क्रिस्पी वेफर बिस्कीटमध्ये भरलेली जाड आइसक्रीम स्लाइस – आजही लोकांचा पहिला पर्याय आहे.
मँगो आइसक्रीम सँडविच ही त्यातील सर्वात जास्त विक्री होणारी डिश आहे.
🍫 कॉर्नर हाऊस – बेंगळुरूचं ‘डेथ बाय चॉकलेट’
1982 मध्ये सुरू झालेलं हे पार्लर बेंगळुरूच्या फूड लव्हर्सचं फेव्हरेट स्पॉट आहे.
‘डेथ बाय चॉकलेट’ ही त्यांची सिग्नेचर डिश – ज्यात चॉकलेट केक, आइसक्रीम, गडद चॉकलेट सॉस, कुरकुरीत नट्स आणि चेरी यांचा मनमोहक संगम आहे – चॉकलेटप्रेमींसाठी पर्वणीच!
🥥 नॅचरल्स – ‘टेंडर कोकोनट’चं नैसर्गिक गारवा
1984 मध्ये सुरू झालेलं ‘नॅचरल्स’ आइसक्रीम कोणत्याही कृत्रिम चविविना तयार केलं जातं. त्यातील सर्वात लोकप्रिय फ्लेवर म्हणजे ‘टेंडर कोकोनट’ – जो खर्या नारळाच्या गाभ्यापासून बनवला जातो आणि नैसर्गिक चवाचा मनस्वी अनुभव देतो.
🌶️ अप्सरा आइसक्रीम – ‘स्पाइसी स्वीट गुआवा’चा भन्नाट फ्लेवर
मुंबईतील ‘अप्सरा आइसक्रीम’ सतत नवे प्रयोग करत लोकांच्या पसंतीस उतरत आहे. ‘स्पाइसी स्वीट गुआवा’ हा फ्लेवर म्हणजे पेरू आणि मिरची यांचा अविस्मरणीय संगम. या आइसक्रीममध्ये पेरूचे तुकडे आणि सौम्य मसाला वापरून तयार केलेला हा प्रकार मिरची पावडर टॉपिंगसह सर्व्ह केला जातो – एकदम हटके अनुभव!
🍨 पब्बाज गडबड – मंगळुरूचं रंगीबेरंगी आश्चर्य
1975 पासून मंगळुरूतील ‘पब्बाज’ यांचं ‘गडबड आइसक्रीम’ हे नाव घराघरात प्रसिद्ध आहे. ताजी फळं, जेली, नट्स, विविध फ्लेवर आणि टेक्सचरचा थर – यामुळे हे आइसक्रीम केवळ गोड नव्हे, तर अनुभवाचं गडबड मिश्रण बनतं!
या पावसाळ्यात गरम गरम भजी किंवा चहा जितके लोकप्रिय, तितकेच भारतीय आइसक्रीमचे हे ‘स्वादभरे थेंब’ जगभर लोकांच्या मनात जागा निर्माण करत आहेत. भारतात तयार होणारी आइसक्रीम केवळ गोड नव्हे – तर सांस्कृतिक, प्रादेशिक, आणि चवीनं समृद्ध आहे.