( गुहागर )
शिवसेना नेते व आमदार भास्करराव जाधव यांच्या चिपळूण येथील नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या पत्नी सौ. सुवर्णाताई भास्करराव जाधव यांच्या हस्ते फीत कापून जल्लोषात पार पडले. यावेळी कार्यालयातील प्रमुख केबिनचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रशांत यादव यांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्घाटनप्रसंगी मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध पक्षांचे स्थानिक नेते उपस्थित होते. उपस्थितांनी आमदार जाधव यांच्या नव्या कार्यालयासाठी शुभेच्छा दिल्या.
याच कार्यक्रमादरम्यान सौ. सुवर्णाताई जाधव यांचा वाढदिवस देखील उत्साहात साजरा करण्यात आला. फुलांचे हार, केक आणि शुभेच्छांच्या वर्षावात वाढदिवसाचे औचित्य साधून वातावरण आनंदमय झाले होते.
या कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, नवीन कार्यालय हे जनतेच्या सेवेसाठी अधिक प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास आमदार जाधव यांनी व्यक्त केला.