२३ जूनपासून राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर आता वर्षभरातील शालेय सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सण-उत्सव, उन्हाळी सुट्टी तसेच रविवारीची नियमित सुट्टी यांचा समावेश असून एकूण १२८ दिवस सुट्या असणार आहेत.
शाळेची वेळ
- पूर्णवेळ शाळा: सकाळी १०:३० ते सायं. ५:००
- अर्धवेळ शाळा: सकाळी ९:०० ते दुपारी १:३०
शाळेच्या दिवशी एकूण ६० मिनिटांची मुख्य सुट्टी असेल. याशिवाय, पहिल्या व दुसऱ्या सत्रात प्रत्येकी १० मिनिटांच्या दोन लहान सुट्ट्या असतील.
महिन्यानुसार शाळेच्या सुट्ट्या
जुलै
- आषाढी एकादशी
- मोहर्रम
- नागपंचमी
ऑगस्ट
- रक्षाबंधन
- स्वातंत्र्य दिन
- गणेश चतुर्थी
सप्टेंबर
- गौरी विसर्जन
- ईद-ए-मिलाद
- अनंत चतुर्दशी
- घटस्थापना
ऑक्टोबर
- गांधी जयंती
- दिवाळी सुट्टी
नोव्हेंबर
- गुरुनानक जयंती
डिसेंबर
- नाताळ (ख्रिसमस)
जानेवारी
- मकरसंक्रांती
- शब्बे-ए-मेराज
- प्रजासत्ताक दिन
फेब्रुवारी
- शब्बे-ए-बरात
- महाशिवरात्री
- श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती
मार्च
- धुलिवंदन
- रंगपंचमी
- शब्बे-ए-कदर
- गुढी पाडवा
- रमजान ईद
- रामनवमी
- महावीर जयंती
एप्रिल
- गुड फ्रायडे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
मे
- महाराष्ट्र दिन
- उन्हाळी सुट्टी (मे अखेरीपासून सुरुवात)

