(संगमेश्वर)
तालुक्यातील कळंबस्ते (भीमनगर) येथील ४३ वर्षीय सुरेश विठ्ठल मोहिते हे रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले असून, यासंदर्भात संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश मोहिते हे दिनांक १७ जून रोजी सायंकाळी आपल्या राहत्या घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेले. त्यानंतर दोन दिवस उलटून गेले तरी ते परतलेले नाहीत. घरच्यांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यांचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही.
या प्रकरणी त्यांच्या वडिलांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद केली असून, कोणीही सुरेश मोहिते यांना कुठे पाहिले असल्यास त्यांनी तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सुरेश मोहिते यांच्या बेपत्ततेने गावात चिंता व्यक्त होत असून, पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.