(पाली / वार्ताहर)
योगामध्ये प्रार्थनेला फार महत्व आहे कारण मनाला स्थिरता येण्यासाठी ती मोलाचे काम काम करते. त्याच बरोबर योगाचे महत्त्व अनन्यसाधारण असून आनंदी व निरोगी जीवनासाठी गरजेचा आहे नियमित योगा केल्यास आरोग्यदायी आयुष्य अनुभवता येते त्यामुळे खऱ्याअर्थाने याची सुरुवात विद्यार्थी दशेतच होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन साठरे शाळा क्र.२चे मुख्याध्यापक दिगंबर तेंडुलकर यांनी केले.
आज साठरे शाळा क्र. २ येथे जागतिक योग दिन विद्यार्थी शिक्षक-पालक यांच्या उपस्थित संपन्न झाला. शाळेतील शिक्षिका स्नेहल तेंडुलकर यांनी उपस्थित सर्वांना वृक्षासन,ताडासन, त्रिकोणासन, पद्मासन, वज्रासन, पश्विमोथानासन, सेतुबंधासन, शशाकासन ही आसने प्रात्यक्षिकांसह दाखवून करून घेतली. यावेळी विद्यार्थी हर्ष तेरेकर, अर्जुन चव्हाण, विक्रांत रसाळ, रुद्र तेरेकर यांनीही प्रात्यक्षिक दाखविले. प्राणायमचे विविध प्रकार करण्यात आल्यावर ओंकार व ५ मिनिटांचे ध्यान घेऊन समारोप करण्यात आला.
यावेळी शा.व्य.स.अध्यक्षा अस्मि शिंदे, सदस्य व आशा सेविका संजीवनी चव्हाण, आरोग्य विभागाच्या जान्हवी सावंत, सौ.किल्लेकर, अंगणवाडी आशा सेविका सौ.बारगुडे,शिक्षक संपदा रसाळ, अस्मिता परुळेकर, स्नेहल तेंडुलकर व पालक उपस्थित होते.