(मुंबई)
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. आता एसटीचे मासिक पास थेट विद्यार्थ्यांच्या शाळा व महाविद्यालयांमध्येच वितरित करण्यात येणार आहेत, अशी घोषणा परिवहन मंत्री आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्राला १६ जूनपासून सुरुवात होत आहे. यानिमित्ताने ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम राज्यभर राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत, विद्यार्थ्यांना यापुढे एसटीच्या पास केंद्रावर रांगेत उभं राहून वेळ वाया घालवावा लागणार नाही.
परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, “पूर्वी विद्यार्थ्यांना पास मिळवण्यासाठी एसटी आगारात जावं लागत असे. आता मात्र शाळा-काॅलेज प्रशासनाने दिलेल्या यादीनुसार एसटी कर्मचारी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक संस्थेतच पास वितरित करतील. त्यामुळे शैक्षणिक वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाचणार आहे.” ही अभिनव योजना राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल. शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळबचतीचा होईल, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्य शासनाकडून विद्यार्थ्यांना एसटी प्रवासावर ६६.६६% सवलत देण्यात येते. म्हणजेच विद्यार्थ्यांना केवळ ३३.३३% रक्कम भरून मासिक पास मिळतो. तसेच, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना’ अंतर्गत बारावीपर्यंत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पास दिला जातो. या सुविधेच्या अंमलबजावणीसाठी राज्यभरातील सर्व शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक/प्राचार्य यांना आगाऊ पत्र देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शाळांनी संबंधित विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मते,