(दापोली / सुदेश तांबे)
झारखंड येथून दापोलीत वास्तव्यास आलेल्या २२ वर्षीय तरुणीने जालगाव बर्वेआई गावातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पिंकीदेवी धर्मेंद्र धामे (वय २२) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
घटना लक्षात येताच स्थानिकांनी तिला तत्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी (PM) दाखल करण्यात आला असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
दापोली पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीवरून ही आत्महत्या असून, तिच्या मागील कारणांची चौकशी पोलीस प्रशासन करत आहे.