( दापोली )
दापोली नगरपंचायतीच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, शिवसेनेच्या सौ. कृपा शशांक घाग यांची नगराध्यक्षा पदावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीने परिसरात जल्लोषाचे वातावरण आहे.
नामदार योगेशदादा कदम यांचा राजकीय करिष्मा पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून, या निवडीमुळे दापोलीतील शिवसेनेला मोठी राजकीय बळकटी मिळाली आहे.
नगरपंचायतीच्या आवारात शिवसैनिकांसह स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत सौ. घाग यांचे जल्लोषात अभिनंदन करण्यात आले.
या निवडीमुळे भविष्यातील दापोलीच्या विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.