(दापोली)
मुलाच्या सर्वांगिण विकासासाठी शाळा, शिक्षक यांचेसह पालकांचीही तेवढीच जबाबदारी असते. पालक आणि मुलांमध्ये अंतर कमी करण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यासोबत सुसंवाद साधावा, असे केंद्रप्रमुख संजय जंगम यांनी दापोली तालुक्यातील कोळबांद्रे बेजेवाडी येथे केंद्रीय परिषदेत मत व्यक्त केले. बालस्नेही गाव तयार करणेसाठी शैक्षणिक पालक सभा किती महत्वाची हे सांगतांना मिशन आपुलकी अंतर्गत प्रत्येक शाळेत होणार्या शैक्षणिक उठावातून शाळा सज्ज व्हाव्यात असेही सांगितले.
प्रारंभी बेजेवाडीचे मुख्याध्यापक प्रमोद तेवरे यांनी सुस्वर असा परिपाठ सादर केला.तद्ंनतर अध्ययन निष्पत्ती आणि नियोजन व कार्यवाही तसेच अध्ययन अध्यापनात येणार्या अडचणीं विषयी सत्यप्रेम घुगे, किशोर पवार आणि संतोष आग्रे यांनी सखोल मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय मनोगतात, संजय मेहता यांनी शै.पालक सभा आयोजित करणे, शंभर टक्के निकाल लावण्याचा प्रयत्न करा. शाळेचा निकाल हा सामुहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व शाळांनी आपल्या परीने प्रयत्न करावे असे सांगतांना
जातांना एकट्याने जाण्यापेक्षा समुहाने पुढे जात आपल्या केंद्राचा नावलौकिक वाढवूया,असे मनोगतात सांगितले. विद्यार्थ्यांप्रती आत्मिक तळमळ बाळगली तर विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ उज्वल असल्याचेही मेहता यांनी शेवटी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर संजय मेहता, संजय जंगम, महेंद्र कलमकर, शामराव वरेकर, सत्यप्रेम घुगे आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण परिषदेचे सुत्रसंचलन महेश शिंदे यांनी केले.