अंकशास्त्र हे एक प्राचीन आणि गूढ शास्त्र आहे, जे माणसाच्या जन्मतारखेच्या आधारे त्याचे स्वभाव, क्षमता, व्यक्तिमत्त्व आणि भविष्य यांचा अभ्यास करते. या शास्त्रात १ ते ९ पर्यंतचे मूलांक अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. प्रत्येक अंकाशी एक विशिष्ट ग्रह संबंधित असतो, जो त्या व्यक्तीच्या जीवनावर थेट परिणाम घडवतो. विशेषतः काही मूलांक असलेल्या व्यक्तींना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांमुळे समाजात एक वेगळी ओळख मिळते. बुद्धिमत्ता, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ही त्यांच्या यशाची गुपितं ठरतात. अशा तीन प्रभावशाली मूलांकांवर नजर टाकूया — जे त्यांच्या अद्वितीय वैशिष्ट्यांमुळे सर्वांनाच प्रभावित करतात.
मूलांक १ :
जन्मतारीख : १, १०, १९, २८
अधिपती ग्रह : सूर्य
मूलांक १ असलेल्या व्यक्ती स्वभावतः धाडसी, आत्मविश्वासी आणि नेतृत्वक्षम असतात. सूर्यप्रमाणेच त्यांचं व्यक्तिमत्त्व तेजस्वी असतं. हे लोक स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणारे, निर्णयक्षम आणि कोणत्याही आव्हानांना सामोरं जाण्याची तयारी ठेवणारे असतात. ते स्वतःचे विचार मांडण्यात धीट, आणि इतरांना मार्गदर्शन करण्यात पुढे असतात. त्यांच्या आत्मविश्वासामुळे आणि स्पष्ट धोरणांमुळे इतर लोक त्यांच्याकडे प्रेरणास्थान म्हणून पाहतात. अनेकदा अशा व्यक्ती नेतृत्वाच्या भूमिकेत यशस्वी ठरतात.
मूलांक ५ :
जन्मतारीख : ५, १४, २३
अधिपती ग्रह : बुध
बुधग्रहाच्या प्रभावामुळे मूलांक ५ असलेल्या व्यक्ती अत्यंत बुद्धिमान, वाक्चतुर आणि व्यवहारशीर असतात. त्यांची निरीक्षणशक्ती तीव्र, आणि निर्णय घेण्याची क्षमता प्रखर असते. अशा व्यक्ती कोणत्याही परिस्थितीचा तपशीलवार अभ्यास करून झपाट्याने निर्णय घेऊ शकतात. त्यांचं बोलणं स्पष्ट, विचारसरणी ठाम, आणि व्यक्तिमत्त्व उत्साही व प्रेरणादायी असतं. हे लोक सामाजिक व्यवहारात कुशल आणि इतरांना सहज आपलसं करणारे असतात.
मूलांक ७ :
जन्मतारीख : ७, १६, २५
अधिपती ग्रह : केतू
केतू ग्रहाशी निगडित असल्यामुळे मूलांक ७ असलेल्या व्यक्तींचा स्वभाव अध्यात्मिक, अंतर्मुख आणि गूढतेने भरलेला असतो. ते शांत, गंभीर आणि खोल विचार करणारे असतात. हे लोक वरवरच्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत; त्यांचा विचार गंभीर आणि अर्थपूर्ण असतो. सतत काहीतरी नवीन शिकण्याची, समजून घेण्याची ओढ त्यांच्यामध्ये असते. ते फारसे सामाजिक नसले तरी त्यांच्या ज्ञानग्रहणाची ओढ आणि स्वतःच्या तत्त्वांवर आधारित जीवनशैली त्यांना विशिष्ट बनवते. त्यांच्यावर लोक विश्वास ठेवतात आणि त्यांचं मत अत्यंत मोलाचं मानतात.
जन्मतारखेनुसार मुल्यांक काढण्यासाठी, आपण जन्मतारखेतील अंकांची बेरीज करावी. जर बेरीज 1 ते 9 पर्यंत असेल, तर तीच संख्या मुल्यांक आहे. जर बेरीज 10 किंवा त्याहून अधिक असेल, तर पुन्हा त्या अंकांची बेरीज करावी, जोपर्यंत एक अंकी संख्या मिळत नाही.
उदाहरणार्थ:
- पहिला अंक (जन्म तारीख): 25
- पहिला अंक (जन्म तारीख) बेरीज: 2 + 5 = 7
- मूलांक: 7
- पहिला अंक (जन्म तारीख): 11
- पहिला अंक (जन्म तारीख) बेरीज: 1 + 1 = 2
- मूलांक: 2