( मुंबई / प्रतिनिधी )
रिपब्लिकन सेना महाराष्ट्र या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार काकासाहेब खंबाळकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल त्यांची तत्काळ रिपब्लिकन सेना पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील रिपब्लिकन सेनेच्या तमाम कार्यकर्त्यांनी पक्षद्रोही काकासाहेब खंबाळकर यांच्याशी कोणताही संबंध ठेवू नये, तसेच सदर पक्षद्रोही सोबत रिपब्लिकन सेनेचा ही कोणताही संबंध राहणार नाही अशी महत्वपूर्ण सूचना रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र सचिव विनोद विठ्ठल काळे यांनी रिपब्लिकन सेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद केली आहे.