(मुंबई)
कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी निसर्गसौंदर्याचा आस्वाद प्रवाशांना घेता यावा यासाठी रेल्वे प्रशासनाने एक खास एकेरी (One Way) विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष गाडी मुंबई सीएसएमटी ते मडगाव जंक्शन या मार्गावर १४ जून २०२५ रोजी धावणार आहे. ही गाडी क्रमांक ०११७१ ही एकेरी विशेष गाडी मुंबई सीएसएमटीहून सकाळी ७:३५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १२:३० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.
या गाडीची खास वैशिष्ट्ये:
- प्रवाशांना निसर्गदृश्यांचा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी विस्टाडोम कोच (Vista Dome Coach) जोडण्यात आला आहे.
- सोबतच चेअर कार आणि सेकंड सीटिंग डबेही असणार आहेत.
डब्यांची रचना (एकूण १६ एलएचबी कोच):
-
विस्टाडोम – १
-
चेअर कार – ३
-
सेकंड सीटिंग – १०
-
एसएलआर – १
-
जनरेटर कार – १
गाडीचे थांबे:
दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी.
ही गाडी पावसाळी पर्यटनप्रेमी आणि कोकणातील सौंदर्य अनुभवू इच्छिणाऱ्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. टिकट बुकिंगसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.