(नवी मुंबई)
ग्रामीण विकास, कृषी व किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या शुभहस्ते व मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत लाभार्थी मेळावा व महा आवास अभियान 2022-23 राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम दिनांक 03 जून, 2025 रोजी मुख्य बॅडमिंटन हॉल, श्री शिव छत्रपती क्रिडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे दुपारी 4.00 वा आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळासाठी पुरस्कारायांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामीण गृहनिमार्ण संचालक डॉ.राजाराम दिघे यांनी केले आहे.
हा कार्यक्रम आपल्या विभागातील सर्व पंचायत समिती सभागृहामध्ये 500 लाभार्थ्यांच्या उपस्थितीत कायक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. तालुकास्तरावरील कार्यक्रमामध्ये लाभार्थ्यांना ‘आवास मित्र अॅपचे प्रशिक्षण ही देण्यात येणार आहे.
अमृत महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार २०२२-२३ खालील प्रमाणे
सर्वात्कृष्ट विभाग
विभागीय आयुक्त, अपर आयुक्त (विकास), सहाय्यक आयुक्त (विकास) या कार्यालयांना प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण मध्ये कोकण विभागाचा प्रथम क्रमांक, नाशिक विभागाला द्वितीय क्रमांक,नागपूर विभागाला तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे .तसेच राज्य पुरस्कार आवास योजने मध्ये नाशिक विभाग प्रथम क्रमांक, कोकण विभाग द्वितीय क्रमांक ,पुणे विभागाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
सर्वात्कृष्ट जिल्हे
जि.प.अध्यक्ष/प्रशासक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण जिल्हा अहिल्यानगर यांना प्रथम व सिंधुदुर्ग द्वितीय क्रमांक, गोंदीया जिल्हयाला तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे. तसेच राज्य पुरस्कार आवास योजनेमध्ये अहिल्यानगर यांना प्रथम, सिंधुदुर्ग द्वितीय क्रमांक, सातारा जिल्हाला तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे.
सर्वात्कृष्ट तालुके
पं.स. सभापती/प्रशासक, गट विकास अधिकारी कार्यालयामध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण मध्ये तालुका पाथर्डी, अहिल्यानगर यांना प्रथम क्रमांक, देवगड, सिंधुदुर्ग द्वितीय क्रमांक, जावळी, सातारा तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे. तसेच राज्य पुरस्कार आवास योजनेमध्ये तालुका जामखेड, अहिल्यानगर प्रथम क्रमांक, आरमोरी, गडचिरोली व्दितीय क्रमांक,अंजनगाव सुर्जी, अमरावती तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे.
सर्वात्कृष्ट ग्रामपंचायती
ग्रा.पं. सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी कार्यालय प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण मध्ये ग्रामपंचायती येळगाव, कराड, सातारा यांना प्रथम क्रमांक, भूडकेवाडी, पाटण, सातारा व्दितीय क्रमांक, चोंढी, मानोरा, वाशिम तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे. तसेच राज्य पुरस्कार आवास योजनेमध्ये ग्रामपंचायत बॉन्द्री, पाटण, सातारा यांना प्रथम क्रमांक, कारखेडा, मानोरा, वाशिम व्दितीय क्रमांक, कुळवंडी, खेड, रत्नागिरी तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे.
सर्वात्कृष्ट बहुमजली इमारती
पं.स. सभापती/प्रशासक, गट विकास अधिकारी मध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण हनुमंत खेडे, धरणगाव, जळगाव प्रथम क्रमांक, भोसा (टाकळी), मोहाडी, भंडारा द्वितीय क्रमांक, मोहगव्हाण, मानोरा, वाशिम तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे. तसेच राज्य पुरस्कार आवास योजनेमध्ये अंतांपूर, बागलाण, नाशिक प्रथम क्रमांक, डोंगरजवळा, गंगाखेड, परभणी व्दितीय क्रमांक शिंद, भोर, पुणे तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे.
सर्वात्कृष्ट गृहसंकुले
पं.स. सभापती/प्रशासक, गट विकास अधिकारी गट प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण मध्ये वांगदरी, श्रीगोंदा, अहिल्यानगर प्रथम क्रमाक, गनोरी, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर द्वितीय क्रमांक, लक्ष्मी दहिवडी, मंगळवेढा, सोलापूर तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे. तसेच राज्य पुरस्कार आवास योजनेमध्ये नांदगाव, अहिल्यानगर, अहिल्यानगर प्रथम क्रमांक, कुशेर बु. आंबेगाव, पुणे व्दितीय क्रमांक, डोंगरगाव, राजुरा, चंद्रपूर तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे.