(देवरूख / सुरेश सप्रे)
अखिल भारतीय जलद रोलर स्केटिंग मानांकन स्पर्धेत महाराष्ट्राच्या रेयांश बने याने एक सुवर्ण व एक रौप्यपदक पटकावत महाराष्ट्राचा झेंडा फडकवत इतिहास आहे..8वी अखिल भारतीय जलद रोलर स्केटिंग मानांकन स्पर्धा २०२५ कोचीन केरळ येथे दिनांक १५ ते १९ मे दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत युवा खेळाडू कु. रेयांश बने याने या स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व केले. या राष्ट्रीय मानांकन स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून रेयांश बने याची निवड झाली होती.
रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा एर्नाकुलम कोंची केरळ येथे पार पडली. या अखिल भारतीय जलद स्केटिंग मानांकन स्पर्धेत कु. रेयांश पृथा पराग बने याने (road1 lap) स्पर्धेत सुवर्णपदक तर (1000mtr rink ) स्पर्धेत रौप्यपदक पदक पटकावत महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
रेयांश हा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणारा सर्वात लहान खेळाडू ठरला आहे. मुंबई-भांडूप येथील महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव माजी आमदार सुभाष बने यांचा रेयांश बने हा नातु असून तो युरो स्कूल, ऐरोली, ठाणे या शाळेचा विद्यार्थी आहे.
रेयांशाने वयाच्या पाचव्या वर्षी महाराष्ट्रातील बेळगाव येथे सतत ९६ तास स्केटिंग करून आपले नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे. त्याने आतापर्यंत विविध स्केटिंग स्पर्धांमध्ये २८ सुवर्ण १० रौप्य आणि ८ कांस्य पदके पटकावली आहेत. कू. रेयांश पृथा पराग बने हा शिवसेना भांडूपचे युवानेते पराग बने, यांचा चिरंजीव आहे. त्याच्या यशाबद्दल सर्व थरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.