( देवरुख / प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२वीच्या(एच. एस. सी.) फेब्रुवारी-मार्च:२०२५ मधील परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजित केला होता. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या तीन शैक्षणिक आस्थापनातील बारावीमध्ये यशस्वी होऊन गुणानुक्रमे अव्वल ठरलेल्या प्रथम पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना विशेष समारंभात सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संसाध्यक्ष सदानंद भागवत, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, प्रा. सुवर्णा साळवी, मुख्याध्यापक मधुकर कोकणी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला प्रा. सीमा शेट्ये, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. शिवराज कांबळे, प्रा. अभिनय पातेरे आणि प्रा. धनंजय दळवी यांच्यासह गुणवंत विद्यार्थी, पालक व नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते.
या सन्मान सोहळ्यात सन्मानित करण्यात आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे:- आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य शाखा- १. स्नेहा शेट्ये, २. मानसी माने ३.साईमा मेमन,४. वैष्णवी आगरे,५. तन्वी साळुंखे, कला शाखा – १. श्रावणी पावले, २. ऋतुजा मुंडेकर, ३. समृद्धी चव्हाण, ४.आचल बांडागळे, ५. सई मुंडेकर, एम. सी. व्ही. सी. विभाग १. आकाश पर्शराम, २. सागर मांगले, ३. तनिष्का चव्हाण, ४. दिक्षा गेल्ये, ५. प्रिती चाचे, ए. ए. पाध्ये ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, १. जान्हवी जाधव, २. शंतनू करंबेळे, ३. श्रावण पातेरे, ४. शुभम साने, ५. हर्ष डोंगरे, गुरुवर्य काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, १. प्रियांका गवंडी, २. राज अडबल, ३ .तेजस्विनी भालेकर, ४. श्रेया बडद, ५. श्रेया चाचे.
विद्यार्थिनी स्नेहा शेट्ये व प्रियांका गवंडी यांनी आपल्या मनोगतातून शिक्षक, महाविद्यालय व संस्था यांनी केलेल्या अनमोल सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले. विद्यार्थ्यांचे पालक श्री. शशिकांत अडबल व प्रा. सीमा शेटये यांनी महाविद्यालय व संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधांबाबत आपल्या मनोगतातून समाधान व्यक्त केले.
मुख्याध्यापक मधुकर कोकणी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी नवीन शैक्षणिक पद्धती आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना आवडत्या विषयात करियर करण्याच्या असणाऱ्या उत्तम संधीबाबत विवेचन केले. अध्यक्ष सदानंद भागवत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भविष्यातील विविध आव्हाने, विविध क्षेत्रांमध्ये असणाऱ्या करिअरच्या संधी, समाजाप्रती विद्यार्थ्यांची असणारीजबाबदारी व कर्तव्य आणि राष्ट्र विकासातील विद्यार्थ्यांचे महत्वपूर्ण योगदान याबाबतचा सखोल आढावा घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मयुरेश राणे यांनी केले. समारंभाच्या यशस्वीतेसाठी संस्था कार्यालयातील किरण चाचे व विलास तावडे यांनी मेहनत घेतले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्था उपाध्यक्षा नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.