( संगमेश्वर / प्रतिनिधी )
नवभारत छात्रालय, दापोलीचे पहिले विद्यार्थी आणि सातत्याने ६० वर्षे छात्रालयाची धुरा समर्थपणे वाहणारे कै. शिंदे गुरुजी यांच्या अथक परिश्रम, सेवावृती व दूरदर्शीपणामुळे दापोली येथे सुरू केलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. कुणबी सेवा संघाचे दापोली येथे नवभारत छात्रालय, पू. सामंत गुरुजी कन्या छात्रालय, कृषि केंद्र, व्यवसाय शिक्षण विद्यालय, लोकनेते शामरावजी पेजे कृषि विकास प्रकल्पः कोळबांद्रे, कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन स्मृतिनिधी, छात्रभूषण प्रा. रघुनाथ गीते शिक्षण सहाय्यक निधी आणि बाळासाहेब खेर कृषिउद्योग व प्रशिक्षण केंद्र असे उपक्रम सुरू आहेत. गुरुजींनी केलेल्या या कार्याचा गौरव व्हावा, समाजामध्ये त्यांच्या कार्याविषयी जाणीव व्हावी या उद्देशाने गुरुजींच्या नावे “सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरुजी स्मृति पुरस्कार” सन २०१०-२०११ वर्षापासून सुरू करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी या पुरस्कारासाठी अर्ज पाठवावेत असे आवाहन कुणबी सेवा संघ, दापोली यांच्याकडून करण्यात येत आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा जानेवारी २०२६ च्या पहिल्या पंधरवड्यात कै. पांडुरंग गणपत शिंदे गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त संपन्न होणार आहे. हे पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील सेवाभावनेने कार्य करणारे प्राथमिक शिक्षक (ग्रामीण व शहरी विभाग), माध्यमिक शिक्षक, शेतकरी, कृषी विस्तार कार्यकर्ता व कृषि उद्योजक यांना देण्यात येणार आहेत. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, मानपत्र व रोख रक्कम रु. ५,०००/- असे आहे. इच्छुक उमेदवारांनी या पुरस्कारासाठी अर्ज पाठवावेत असे आवाहन कुणबी सेवा संघ, दापोली यांच्याकडून करण्यात येत आहे. इतर व्यक्ती किंवा संस्था देखील या पुरस्कारासाठी योग्य उमेदवाराची शिफारस करू शकतात.
उमेदवारांनी स्वतःची किंवा पुरस्कर्त्यांनी उमेदवारांची वैयक्तिक माहिती विहित नमुन्यामध्ये “समन्वयक, सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरुजी स्मृति पुरस्कार समिती, द्वारा नवभारत छात्रालय, शिवाजीनगर, दापोली ४१५७१२, जि. रत्नागिरी” यांच्याकडे दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी किंवा तत्पूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावी अथवा vsvnbc@gmail.com या मेलवर इमेल करावी. या बाबतीत अधिक माहितीसाठी श्री. हरिश्चंद्र अनंत कोकमकर, समन्वयक, सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरुजी स्मृति पुरस्कार समिती, मोबाईल नं. ९०२८४९९०७९ या क्रमांकावर संपर्क साधावा. पुरस्कारासाठी वैयक्तिक माहिती पाठविण्यासाठीचे नमुने वरील ई-मेलद्वारे विनंती केल्यास पाठविण्यात येतील.

