(नवी दिल्ली)
देशातील संसदेत उल्लेखनीय व सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खासदारांना दिला जाणारा ‘संसदरत्न पुरस्कार 2025’ यंदा १७ खासदारांना जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राच्या ७ खासदारांनी बाजी मारत आपल्या कार्याचा ठसा उमठवला आहे.
‘प्राइम पॉइंट फाउंडेशन’ या संस्थेमार्फत दिला जाणारा हा पुरस्कार संसदेत प्रश्न विचारणे, कायदेविषयक सहभाग, वादविवादांतील उपस्थिती, तसेच संसदीय समित्यांतील योगदान या निकषांवर आधारित असतो. यावर्षीच्या पुरस्कारांची निवड राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरी समितीने केली आहे.
संसदरत्न पुरस्कारासाठी निवड झालेल्या महाराष्ट्रातील खासदार :
-
सुप्रिया सुळे – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
-
श्रीरंग बारणे – शिवसेना (शिंदे गट)
-
अरविंद सावंत – शिवसेना (उद्धव ठाकरे गट)
-
नरेश म्हस्के – शिवसेना (शिंदे गट)
-
स्मिता वाघ – भारतीय जनता पक्ष (भाजप)
-
मेधा कुलकर्णी – भारतीय जनता पक्ष (भाजप)
-
वर्षा गायकवाड – काँग्रेस
अन्य संसदरत्न पुरस्कार विजेते :
-
प्रवीण पटेल – भाजप
-
रवि किशन – भाजप
-
निशिकांत दुबे – भाजप
-
विद्युत बरण महतो – भाजप
-
पी. पी. चौधरी – भाजप
-
मदन राठौर – भाजप
-
सी. एन. अन्नादुरई – द्रविड मुनेत्र कळघम (DMK)
-
दिलीप सैकिया – भाजप
संसदीय समित्यांना विशेष गौरव :
वित्त आणि कृषी या दोन संसदीय स्थायी समित्यांनाही संसदेत सादर केलेल्या अहवालांच्या गुणवत्तेच्या आधारे विशेष सन्मान देण्यात येणार आहे.
-
वित्त समितीचे अध्यक्ष – भर्तृहरि महताब
-
कृषी समितीचे अध्यक्ष – चरणजीत सिंह चन्नी (काँग्रेस)
‘संसदरत्न पुरस्कार 2025’ हे संसदीय कार्यात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या खासदारांसाठी एक मोठे प्रोत्साहन आहे. यंदा महाराष्ट्राच्या सात खासदारांचा समावेश ही राज्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. संसदेमध्ये जबाबदारीने, सक्रियतेने आणि गुणवत्ता आधारित कार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे हे सन्मानचिन्ह देशातील लोकशाहीला बळकटी देणारे ठरणार आहे.

