या सजीव सृष्टीचा नियम आहे की ‘ व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तितक्या विकृती ‘ थोडक्यात सांगायचं तर या जगात प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. प्रत्येकाच्या सवयी वेगवेगळ्या असतात मग त्या चांगल्या असो किंवा वाईट असो प्रत्येक जण हा वेगवेगळा असतो .याला कारण म्हणजे त्या त्या व्यक्तीचा चंद्र त्या त्या राशीत असतो .
आपणास माहितच आहे की हे जग नऊ ग्रह , बारा राशी आणि सत्तावीस नक्षत्रांनी वेढलं गेलेलं आहे .या त्यात चंद्र हा मनाचा कारक आहे जो आपल्या स्वभावावर प्रभाव पाडतो . प्रत्येक राशीच्या वेगवेगळा स्वभाव असतो हे वेगळं सांगायला नको .प्रत्येक राशीनुसार प्रत्येकाच्या काही अशा वाईट सवयी असतात की ज्या त्या माणसाला समाजात बदनाम करतात .त्याचबरोबर त्या माणसाला अपयशाकडे घेऊन जातात .पण आपण स्वतःवर काम करून त्या त्या सवयी सोडल्या तर आपण यशस्वी आणि सुखी जीवन जगू शकू आणि समाजात लोकप्रिय व्यक्ती म्हणून नावारूपाला येऊ शकू .चला तर मग त्या कोणकोणत्या सवयी आहेत ते बघुयात .
मेष राशी =
रागीटपणा ,लहरीपणा ,हेमजीकलनेस ,उतावीळपणा ,प्रमाणापेक्षा जास्त डॅशिंग राहणे ,अति घाई , प्रत्येक वेळी संवाद करताना सहज अपशब्द वापरणे ,फटकळ बोलणे ,भांडखोरपणा ,हट्टीपणा, स्वतःचं खरं करणे , इत्यादी
वृषभ राशी =
आळशीपणा, स्वार्थीपणा ,हट्टीपणा ,योग्य वेळी व्यक्त न होणे इत्यादी
मिथुन राशी =
वायफळ बडबड करणे ,न विचारता सल्ले देणे ,आगाऊपणाने बोलणे ,जीवनाबद्दल गांभीर्य नसणे ,अस्ताव्यस्त राहणीमान , स्वतःला सगळ्या गोष्टीत जास्तच कळतं असं दाखवणे ,प्रत्येक ठिकाणी मध्येमध्ये करणे इत्यादी
कर्क राशी =
नाटकीपणा ,बालिशपणा , आत एक आणि बाहेर एक असं वागणे ,आपल्या तोलामोलाच्या लोकांमध्ये मिसळणे त्यांच्याशी हसून खेळून वागणे आणि इतरांशी अंतर राखून वागणे ,विशेषतः महिलांचा माहेरी जास्त ओढा असणे , एखाद्याला वेळेला मदत न करणे व वड8निघून गेली की सांत्वन करणे म्हणजे मी मदत केली असती पण अमुक झालं तमुक झालं , अति गोड बोलणे छान छोकीची आवड असणे इत्यादी
सिंह राशी =
अहंकार ,स्वतःचेच खरे करणे ,बेपर्वाई वृत्ती ,चाहडखोरपणा ,मनमानीपणा ,आगाऊपणा , रागीटपणा ,कठोरपणा ,फटकळपणा ,प्रमाणापेक्षा जास्त तत्वनिष्ठता इत्यादी
कन्या राशी =
अति व्यावहारिकपणा भिडस्त पणा ,प्रमाणापेक्षा जास्त सहन करणे , कंजूस पणा , एखाद्याच्या गुणांचं लवकर कौतुक न करणे , बोगस गप्पा मारणे , योग्य वेळी धाडसी कृती न करणे ,खादाडपणा इत्यादी
तूळ राशी =
स्वार्थीपणा ,अति खर्चिक वृत्ती ,अति व्यवहारीपणा, नात्यांपेक्षा पैशांना जास्त महत्त्व देणे ,छानछोकीची आवड असणे ,वेळेला मदत न करणे ,कमी बोलणे ,लवकर व्यक्त न होणे इत्यादी
वृश्चिक राशी =
हिंसक सूडबुद्धी ,उद्दामपणा ,स्वार्थीपणा , हेकेखोर पणा, तापट पणा , अहंपणा , प्रखर कामावसनेवर नियंत्रण न राहणे , धोका देण्याची वृत्ती , कमी बोलणे ,व्यक्त न होणे ,कुढत जिवन जगणे, फटकळपणा इत्यादी
धनू राशी =
स्वतःला शहाणे समजणे ,फटकळपणा ,पटकन कुणावरही आंधळा विश्वास ठेवणे ,वायफळ बडबड करणे , व्यावहारिकता कमी इत्यादी
मकर राशी =
काहीसे आळशी ,नैराश्य वादी दृष्टिकोन , जीवनातील आनंदापेक्षा सतत कामाला महत्त्व देणे ,सतत स्पष्ट व कडवट बोलणे इत्यादी
कुंभ राशी = सतत अंतर्मुख राहणे ,व्यक्त न होणे , स्वतःला जास्त हुशार समजणे , स्वतः चंच खरं करणे , चेष्टामस्करी सहन न करणे इत्यादी
मीन राशी =
अति भावनिक, भाबडेपणा, व्यवहारज्ञान कमी ,छानछोकीची जास्त आवड असणे ,कष्ट करण्याची कुवत कमी असणे , बोगस गप्पा मारणे , भिडस्तपणा, आळशीपणा इत्यादी
( प्रत्येकाच्या ग्रहस्थिति नुसार फलिताची तीव्रता कमी जास्त होऊ शकते )
ज्यो. सिद्धेश कुलकर्णी

