(चिपळूण)
दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षेत अमेय क्लासेस सावर्डेने दैदीप्यमान यश मिळवले आहे. यामध्ये कु. आर्या रामचंद्र नांदिवडेकर हिने 99 % गुण मिळवत चिपळूण तालुक्यात अव्वल स्थान पटकावले आहे. तर कु. समिक्षा सातभाई हिने 95.20 %, कु.रिया गोसावी हिने 81.40 % गुण, कु. समृद्धी गुरव 73% गुण, महेक सारवान 70.20 % मिळवून यश संपादन केले आहे. या यशाबद्दल अमेय क्लासेस चे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.
सूक्ष्म नियोजन, सर्व विषयांचे अचूक मार्गदर्शन, साप्ताहिक चाचणी सराव,भरपूर प्रश्नपत्रिका सराव, विद्यार्थी निहाय मार्गदर्शन यामुळे हे यश मिळाले आहे, असे विद्यार्थी तसेच पालकांनी सांगितले.
विषय शिक्षिका सौ. वृषाली नांदिवडेकर मॅडम , सौ. सोनम कदम मॅडम व सौ. मैथिली बांद्रे मॅडम यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारा हा क्लास म्हणून ओळखला जातो. अभ्यासाची तयारी सोबत सर्वागिण विकासासाठी विविध उपक्रम, पूरक मार्गदर्शन वर्ग, गेस्ट टीचर, विद्यार्थी -पालक -शिक्षक असा त्रिवेणी बंद निर्माण करण्यात अमेय क्लासेस यशस्वी झाला असल्याने पालक आपल्या पाल्याच्या प्रगती बाबत समाधानी आहेत. या यशाबद्दल सर्व स्तरातून अमेय क्लासेस सावर्डे चे अभिनंदन होत आहे.